0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात खबरदारी घेतली जात आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. यासोबतच खबरादारी म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान दहावीचे पेपर सुरू आहेत. हे पेपर ठरलेल्या होणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता दहावीच्या एका विषयाचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. सोमवारी 23 मार्च रोजी भूगोल आणि सामाजिक शास्त्र -2 चा पेपर होता. मात्र, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणारा पेपर आता 31 मार्च नंतर घेतला जाणार आहे. 31 मार्चनंतर परीक्षा पेपरची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Post a comment

 
Top