web-ads-yml-728x90

Breaking News

'शिवसेनेने विचार केला पाहिजे, हे सरकार राष्ट्रवादी चालवतंय'


BY – युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयात शिवसेनेचाही सहभाग होता, हे शिवसेना विसरत आहे. तुम्हीच घेतलेल्या निर्णयांना तुम्ही आता विरोध करत आहात, राज्य सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचा खोचक टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी लगावला. आज शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.अनैसर्गिक युतीने राज्यात हे सरकार आले आहे, चांगले काम करण्याऐवजी पूर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि ते घेण्यात सहभागी असलेली शिवसेना आता ते रद्द करत आहे. शिवसेना हे विसरत आहे की, जलयुक्त शिवार, सारथी असे निर्णय घेण्यात शिवसेनाही भाजपसोबत होती. शिवसेनेने विचार केला पाहिजे की, हे सरकार राष्ट्रवादी चालवत आहे. त्यांचा विरोध हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेली खुन्नस असून यातून शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार चालवले जात आहे. शिवसेनेला हे समजूनही ते आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून द्यायला तयार असतील, तर आमची काहीही हरकत नाही. मात्र, शिवसेनेला या वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायला हवी, की गेल्या पाच वर्षात घेतलेल्या अनेक निर्णयाला तुमचाही पाठिंबा होता, असे पाटील म्हणाले.

No comments