0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – गुरगाव |
गुरगाव शहरातील एका मोठया हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा निष्काळजीपणा पेशंटच्या जिवावर बेतल्याची घटना घडली आहे.डॉक्टरवर पेशंटच्या नातेवार्इकानी गंभीर आरोप केले आहे.ज्या ऑर्थोपेडिक सर्जनच्या नावावर ऑपरेशन केले गेले तो डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हजरच नव्हता तो ऑपरेशन मध्येच सोडुन विमानाने निघुन गेला यामुळे बीपी नियंत्रित न झाल्याने पेशंटचा मृत्यु झाला.जेव्हा नातेवार्इकांनी डॉक्टरला भेटण्याचा हट धरला तेव्हा डॉक्टर नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.तसेच हे प्रकरण मिटविण्याचे हॉस्पिटलमधून सांगण्यात आले.भीम सिंह (वय 65) हे राजस्थानमधुन रिंगसला येत होते.यावेळी त्यांच्या कारचा टायर फुटला.स्टेपनी बदलुन ते गाडीमध्ये बसणार तेवढयातच त्यांना मागून येणाया गाडीने उडविले.यामध्ये सिंह यांचे पाय ट्रकच्या चाकाखाली आले.त्यामुळे त्यांना जवळच्या कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गुरगावच्या आर्टिमिस या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.सिंह यांच्या नातेवार्इकांना डॉक्टरांनी लवकरच ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगू 3 लाख रूपये जमा करण्यास सांगितले.पैसे जमा करूनही डॉक्टरानी सकाळचे 6 वाजताचे ऑपरेशन दुपारी 12 वाजता घेतला ऑपरेशन दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होते.मात्र ऑपरेशन मध्येच टाकून डॉक्टर आपल्या खासगी क्लिनिकला भेट देऊन विमानाने पसार झाल्याची माहिती नातेवार्इकांना देण्यात आली.मग हा ऑपरेशन कोण करत होते असा प्रश्‍न नातेवार्इकांनी विचारला आहे.रविवारी सकाळी 7 वाजता पेशंटला मृत घोषित करण्यात आले होते.याबाबत पोलिसांमध्ये लिखित तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.तसेच या ऑर्थोपेडिक ची चौकशी करून हे बंद करण्याची मागणी आता नागरिकांतुन होत आहे.


Post a comment

 
Top