0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – भोपाळ |
मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झाले आहे (Shivraj Singh Chauhan become MP CM). भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सरकारची सूत्रं हाती येताच शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच आपलं पहिलं प्राधान्य कोरोना नियंत्रणाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजभवन येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते थेट वल्लभ भवन येथे पोहचले. तेथे त्यांनी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मध्य प्रदेशमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये सध्या कोरोनाने नुकतंच डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये त्यावर नियंत्रणासाठी प्रयत्न केलं जात आहे. शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या आपल्या पहिल्या ट्विटमध्ये सर्वात आधी कोरोनाशी लढायचं असल्याचं सांगितलं.


Post a comment

 
Top