0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लागू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीला आता एसटीची लालपरी आणि बेस्ट बसेस तैनात करण्याचे निर्देश…
एसटीने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची ने- आण करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली व कल्याण (सकाळी ८:००,८:१५) येथून तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी बसेसची सोय केली आहे.
 बेस्ट बसेस-
* बोरिवली स्टेशन-मंत्रालय (८:००,८:३०),
* शासकीय वसाहत बांद्रा-मंत्रालय(८:३०,९:००)
* पनवेल स्टँड-मंत्रालय (७:३०,८:३०)
* ठाणे कॅडबरी जंक्शन-मंत्रालय (८:००,८:३०)
* डॉ.आंबेडकर उद्यान चेंबूर-मंत्रालय(८:३०,९:००)
* विक्रोळी डेपो-मंत्रालय(८:३०,९:००)
* खुराणा चौक वरळी-मंत्रालय(८:४५,९:००)
याबरोबरच बृहन्मुंबई महापालिका ,शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार,पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी आदी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरून बसेसची सोय…
* पनवेल,पालघर,आसनगाव,विरार कल्याण , बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली,वाशी दादर व ठाणे (खोपट)या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत एसटी बसेस.
* तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.
* एसटीच्या बसेस दर ५ मिनिटांला या प्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.
या मार्गावर धावणार बसेस
* डोंबिवली-ठाणे
* पनवेल-दादर
* पालघर-बोरिवली
* विरार- बोरिवली
* टिटवाळा-ठाणे
* आसनगाव- ठाणे
* कल्याण- ठाणे
* कल्याण –दादर
* बदलापूर –ठाणे
* नालासोपारा- बोरिवली
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी ‘ बेस्ट ’ बसेसची सेवा एसटीच्या बसेसना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे, या सेवेचा संबंधित प्रवाशांनी लाभ घेण्याचे एसटी व बेस्ट प्रशासनाचे आवाहन…

Post a comment

 
Top