0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - पनवेल |
ज्या महाराजांनी बारा बलुतेदार,पगडजाती सोबत घेऊन स्वायत्त महाराष्ट्राची स्थापना केली.महाराष्ट्राची पावण झालेली धरती आजही त्यांच्या प्रेरणेने ज्वलंत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे शिवजयंती सर्वत्र महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ठिकठिकाणी मिरवणूका,बार्इक रॅली व अन्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शिवजयंती हा आपला सण आहे हा सण आज रोजी रायगड जिल्हयातील पनवेल शेडूंग येथिल सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयात विद्दयार्थ्यांसह शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची स्थापना करून पुजन केले व महाराष्ट्राच्या दैवताचे दर्शन घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची स्थापना सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे यांनी महाराजांना नमन करून केले.यावेळी महाराजांनी तळागळाच्या प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी केलेल्या निर्भिड कार्याचा इतिहास विद्दयार्थ्यांसमोर ठेऊन त्यांच्या मनात महाराजांच्या कार्यसिध्दीची प्रतिमा जागृत करून झेंडा हातात घेण्यापेक्षा त्यांचे विचार मनात बाळगून त्यांच्या प्रेरणेने तमाम तरून वर्गांनी महाराष्ट्राला पुढे न्यावे असे प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे यांनी विद्दयार्थ्यांशी संवाद साधतांना सांगितले.यावेळी समाजसेवक व तरूणवर्गांचे मार्गदर्शक मेघनाथ तांडेल यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करत महाराजांच्या कार्याची कार्यप्रणाली आपल्या संवादतेतून सांगितली.या शिवजयंती सोहळयाला प्रोफेसर सुभाष सोनकर,प्रोफेसर अभिनव दुबे,प्रोफेसर रंजिता अग्रवाल,प्रोफेसर सोनिका ढाका,लायब्रेरियन विभागाचे अलिशा जगताप यांच्यासह शेकडो विद्दयार्थ्यी उपस्थित राहिले होते.यावेळी जय भवानी जय शिवाजी एकच नारा घुमला.


Post a comment

 
Top