web-ads-yml-728x90

Breaking News

म्हारळ मुरबाड रस्त्याची वाहतूक कोंडी कायमच ; नागरिकांचा वाढता संताप वाहतूक पोलिसांना भोवणार

BY – कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण म्हारळ कांबा रोडावर वाहतूक कोंडी ही मोठी बाब नाही.वाहतुक पोलिस आर.टी.ओ बिर्लागेटवर वाहतूकांना त्रास देण्यासाठी सज्ज असतात परंतू वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एैनवेळी एकही वाहतूक पोलिस हजर नसतो हे म्हणावं तेवढं दुदैवच आहे.नागरिकांची हेळसांड करून त्यांच्या गाडया अडवून बिर्लागेटवर आपली ताकद दाखविणारे आणि आरेरावी भाषा वापरून नागरिकांची लूट करणारे पोलिस म्हारळ कांबा येथिल वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास अपयशी ठरले आहेत.अधिकारी वर्ग खुर्चित बसून गप्पा मारत आपल्या कार्यातून पळवा पळवी करत असतांना म्हारळ कांबा हद्द येत असल्याचे बहाणा करित आहे.त्यातच रस्ता वाढला परंतू येथिल वाहतूक कोंडी मात्र तशीच राहिली आहे.येथून लाखो प्रवाशी व हजारो वाहने प्रवास करित असतात त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वर्ग हा कामावर जाणार्‍यांची संख्या सांगून जाते.अलिकडे इमारती,बंगलो प्रोजेक्ट या रस्त्यावर आल्या आहे.त्यांवर लक्ष घालण्याएैवजी सर्वसामान्यांच्या घरावर घाला घालून रस्ता चौपद्री केला गेला.परंतू वाहतूक कोंडीवर अद्दयापही कोणता पर्याप काढला गेला नाही.कित्येक वाहतूक कोंडीमुळे भांडणं निर्माण झाली आहेत.शासनाच्या व येथिल स्थानिक लोकप्रतिनिधी व  नागरिकांना त्रास देणार्‍या वाहतूक पोलिसांमुळे सदरची वाहतूक कोंडी उत्पत्ती ही होत आहे यावर पर्याय अजुनही न काढल्याने प्रवाशी वाहन चालक यांनी संताप व्यक्त केला आहे.वाहतूक कोंडी दूर करणारे पोलिस जर ब्रिज खाली थांबून नागरिकांच्या गाडया अडवित असतील आणि काली पीली जीभ जी बेकायदेशीर चालून नागरिकांना कोंबून नेत असतील आणि ट्रकवाल्यांच्या भल्यामोठया गाडया सोडत असतील तर खरच या वाहतूक पोलिसांचा व त्यांच्या वरिष्ठांचा पुरस्कार देऊन सन्मानच केला पाहिजे कारण वाहतूक कोंडी सुरळीत करणे सोडून जर पैसा कमविण्याचा पर्याय निवडत असेल तर आगे बडो असे म्हणणेच योग्य ठरेल.

No comments