0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे  |
उंड्री येथे पहाटे थरार बेकरीत काम करणाऱ्या कामगारास मारहाण करत खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अकराव्या मजल्यावरुन त्याला खाली फेकले आहेत. पुण्याजवळच्या उंड्रीत थरारक हत्याकांड उघडकीस आलं आहे. सागर किलवरी असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.मंगळवारी पहाटे हा थरार घडला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खडी मशीन चौकाजवळील कुल अत्सव सोसायटीमध्ये ही घटना घडली. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला.

Post a comment

 
Top