0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
परदेशातून आलेल्या भंगारातील मास्क धुवून वापरात आणण्याचा प्रकार उघड केला होता. त्यानंतर या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा भंगारातील मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून या कारवाई आदेश देण्यात आले.वळ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक अमोल कदम (Bhiwandi Mask Reuse Issue) यांच्या तक्रारीनंतर रविवारी रात्री दहा वाजता कलम 269 नुसार इम्रान शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असताना भारतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार येत असून त्यामध्ये वापरलेले मास्कसुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत.

Post a Comment

 
Top