web-ads-yml-728x90

Breaking News

कु.पुजा डकरे यांना महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार...

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार कु.पुजा डकरे यांना देण्यात आला.हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मानव सेवा विकास फाऊंडेशन, महाराष्ट्र दि  पावर ऑफ मिडीया फाऊंडेशन शिवराज्य प्रतिष्ठान, पुणे यांच्या अनुषंगाने हा पुरस्कार देण्यात आला.कु. पुजा डकरे यांनी अनेक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला.मग ते सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,साहित्यिक,किडा,कृषी,राजकीय,अर्थशास्त्र ह्या अनेक क्षेत्रामध्ये कु.पुजा सुरेशराव डकरे यांनी काम केले.आता पर्यंत कु.पुजा डकरे यांचे दोन पुस्तके प्रकाशित झालेत.कवितासंग्रह "बिकाट वाट" आणि कादंबरी " प्रवाहाच्या विरूध्द दिशेने " ह्या दोन्ही पुस्तकांनी महाराष्ट्राला नविन दिशा दिली.कादंबरीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झाल्यात.राजकीय क्षेत्राचा विचार केला तर कु.पुजा डकरे ह्यानी निवडणुकीमध्ये अतीशय मोलाचे काम केले.मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती चे काम केले.लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अमरावती येथे पत्रकार परिषद घेतली.तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मुंबई ला पत्रकार परिषद घेतली.समाजाचा आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी कु.पुजा डकरे यांनी अनेक ठिकाणी व्यवसायिक मार्गदर्शन केले.पुरस्कार स्वीकारतांना कु.पुजा डकरे म्हणतात," समाजाची प्रगती करायची असेल तर समाजकारणा पेक्षा अर्थकारण महत्त्वाचे आहे, समाजाचा आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.कु. पुजा डकरे यांना महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार 2020 हा पत्रकार भवन,पुणे येथे देण्यात आला.उपस्थित प्रमुख मान्यवर शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष जळगाव खा. मा.मंगला बारी,मा.धनंजय धोपावकर ( वरिष्ठ पोलीस अधिकारी, पुणे) , मा.श्री.शरद गोरे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद) , मा.श्री.रतनजी फुसे ( राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक , नाशिक), मा.सौ.अनुराधा चौरसिया (महाराष्ट्र अध्यक्ष -  आदर्श चौरसिया महासभा, दिल्ली) , डाॅ.नंदकिशोर पाटील (अध्यक्ष- राष्ट्रीय सैनिक संस्था , गाझियाबाद, विभागीय अध्यक्ष: महाराष्ट्र पत्रकार सेवा संस्था, मुंबई),  इत्यादी प्रमुख अतिथी उपस्थित होते.

No comments