0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे उत्सव शांतेत पार पडावेत, यासाठी जिल्ह्यामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने योग्य ते प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागू केले आहेत.
रंगपंचमीच्या   उत्सवात  सार्वजनिक ठिकाणावरील झाडे तोडणे, जाळणे तसेच पादचाऱ्यांवर रंगीत पाणी उडविणे, मद्यधुंद होऊन महिलांची छेड काढणे असे प्रकार घडल्यास त्वरित त्यांच्यावर कारवाई  करण्याच्या सूचना जिल्ह्यातील  सर्व पोलीस ठाण्यांना दिलेल्या आहेत.सदर आदेश हा १४ मार्च पर्यंत अंमलात राहणार असून लोकांना कोणताही त्रास होऊ नये, उत्सव शांततेत पार पडावे यासाठी आरोग्यास अपाय होईल अशा रंगांचा वापर करणे टाळावे, सार्वजनिक जागेत अश्लील गाणी गाणे, अश्लील शब्द उच्चारणे, घोषणा देणे, सार्वजनिक जागेत विकृत हावभाव करणे किंवा वाकुल्या व विडंबने त्याचबरोबर एखाद्याच्या प्रतिष्ठा, योग्यता व नैतिकतेला धक्का पोहाचावील्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.  

Post a comment

 
Top