0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – वसई |
रविवार दि. १५ मार्च २०२० रोजी शिवराज्य प्रतिष्ठान (रजि.) वसई- पालघर , महाराष्ट्र आयोजित शिवराज्य चषक २०२०  भव्य क्रिकेट स्पर्धा राबवण्यात आली होती. यामध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता तसेच ही स्पर्धा शिवराज्य प्रतिष्ठानची क्रीडा समिती प्रमुख श्री.नितीन भावे साहेब तसेच श्री.निलेश मौले साहेब व पदाधिकारी आणि सभासद बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.या स्पर्धेचे सुरुवात दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
-: शिवराज्य चषक २०२० विजय संघ :-
१)प्रथम क्रमांक - कोकरे क्रिकेट संघ - महाड
२)द्वितीय क्रमांक - गणेश क्रिकेट संघ टोळवाडी - महाड
३)तृतीय क्रमांक - सोनघर - म्हसळा
मालिकावीर -  राहूल गणेश क्रिकेट संघ टोळवाडी
उत्कृष्ट गोलंदाज- पियुष भावे (कोकरे)
उत्कृष्ट फलंदाज- आमिर नाडकर (कोकरे)
या शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष:- आदरणीय पुर्वांग तांदळेकर साहेब, उपाध्यक्ष:- रोहन गजमल, उपाध्यक्ष: शरद शिगवण,सचिव: मनोज जाधव, खजिनदार : संजय वाघमारे सर्व क्रीडाप्रमुख,पदाधिकारी,आणि सभासद बंधू भगिनी उपास्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अजित आर्डे यांनी केले. तसेच शेवटी शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सर्व सहभागी संघांचे तसेच विजयी संघांचे आभार मानले.

Post a comment

 
Top