web-ads-yml-728x90

Breaking News

70 रूग्णांसह इमारत कोसळली बचावकार्य सुरू

BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
शनिवारी चीनच्या फुझियान प्रांतातून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. चीनच्या अधिकृत माध्यमानुसार शनिवारी कुंझझो शहरातील शिंजिया हॉटेल कोसळले. या घटनेत 70 जण ढिगाऱ्या खाली दफन झाल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 80 खोल्यांच्या हॉटेलमध्ये कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांवर उपचार सुरु होते. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. बचावात 23 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, परंतु अद्याप 70 लोक अडकले असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना सांगितली जात आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू असून पुरले गेलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.

No comments