web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, 5 मित्र जागीच ठार, एक सुखरुप बचावला

BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. जुन्या महामार्गाकडे जाणाऱ्या अंडा पॉइंट खंडाळा येथील तीव्र धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असणारा टेम्पो पलटी झाला. यामध्ये 5 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामधील एक जण सुखरुप आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला आणि त्याचवेळी तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सहा मित्रांच्या अंगावर उलटला. यामध्ये पाच जणांचा बळी गेला आहे.सर्व दुचाकीस्वार पर्यटनासाठी अलिबाग येथे गेले असल्याची माहिती मिळाली. तेथून पुन्हा पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट एक्सकोट टीम आणि अपघात ग्रस्त टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. टेम्पो खाली चिरडलेल्यांना बाहेर काढण्यात मदत करण्यात आली. खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाती टेम्पो रस्त्यातून बाजूला केला.

No comments