web-ads-yml-728x90

Breaking News

31 मार्चपर्यंत बंद राहणार देशभरातील सर्व रेल्वे

BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
देशभरातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हे संक्रमण थांबवण्यासाठी आता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने सांगितले की, सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या, एक्सप्रेस आणि इंटरसिटी ट्रे 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे की, रद्द ट्रेनच्या यादीमध्ये कोलकाता मेट्रो, कोकण रेल्वे, उपनगरीय ट्रेने चालणार नाही. तर आज रात्री 12 वाजेपर्यंत उपनगरीय ट्रेन, कोलकाता मेट्रोच्या सेवा सुरू राहतील.ज्या ट्रेन 22 तारखेला चार तासांपूर्वी चालणे सुरू झाल्या होत्या. त्या आपल्या ठरलेल्या ठिकाणापर्यंत जातील. रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या काळात माल गाड्या सुरू राहणार आहेत. रेल्वेने सांगितले की, देशभरात आवश्यक वस्तुंचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी या मालगाड्या सुरू राहतील.

No comments