0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
देशात 21 दिवसाचा लॉडाऊन पंतप्रधानानी जाहिर केल्याने तमाम नागरिकांनी आपली वाहाने दुकाने व्यवसाय बंद करून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.21 दिवसाने कोरोनावर मात होर्इल त्यानंतर आपला लग्न कार्यक्रम सोहळयाची मज्जा लुटा आज प्राणघातक आरोग्यावर मात करू या अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.पोलिसांनी प्रत्येक नागरिकांची काळजी घेतली आहे.त्यांच काम तमाम जनतेसाठी आहे.आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे.तसेच शासनाने कर्तव्यावर असणार्‍या सर्वाचे नुसते आभार न मानता त्यांना बक्षिस पात्र योगदान दयावे.त्यांना धान्य,भाजीपाला याची सोय करून दयावी त्यांच्या कुटूंबाची काळजी घ्यावी अशी मांगणी विकासमंच अध्यक्षा ज्योती शेलार यांनी केली आहे.भाजीपाला दुध याचे स्टॉल प्रत्येक शहरात लावण्यात यावे शासनाने त्यावर लक्ष ठेवावे.गहु,तांदुळ,डाळ,तेल,कांदे,बटाटे अत्यावश्यक सेवा प्रत्येक प्रभागात शासनाने उपलब्ध करून दयावेत,गोरगरीबाना समस्या जाणुन घेण्यासाठी प्रत्येक गांवात पथक नेमावा,अत्यावश्यक कामासाठी वाहानाना परवानगी दयावी.गांवात बंद केलेल्या सिमा गेट खुल्ले करावे.प्रमुख प्रवेश दारावर आरोग्य तपासणी पथक ठेवावे अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.

Post a comment

 
Top