BY – युवा महाराष्ट्र
लाइव – नवी दिल्ली |
कोरोना विषाणूविरूद्ध लढा जाहीर केल्यानंतर पंतप्रधान
नरेंद्र मोदी आपल्या मतदारसंघ वाराणसीतील जनतेला सामोरे गेले. पीएम मोदी वाराणसीच्या
लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलले. साथीच्या कोरोना विषाणूबद्दल बोलताना पंतप्रधान
मोदी म्हणाले की, महाराभारत हे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले, 21 दिवसात कोरोना विरुध्दची
लढाई जिंकायची आहे. अस मत त्यांनी यावेळी मांडले.पंतप्रधान म्हणाले की काशीचा अनुभव
शाश्वत आहे आणि म्हणूनच आज लॉकडाऊनच्या परिस्थितीत काशी देशाला - संयम, समन्वय, संवेदनशीलता
शिकवू शकते. तसेच काशी देशाला सहकार, शांती, सहिष्णुता शिकवू शकते. यासोबताच साधना,
सेवा, समाधान ही काशी कडून शिकाव लागेल अस ही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी कोरोना व्हायरसच्या
धोक्यामुळे पीएम मोदींनी लोकांना घरात राहण्यास सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, कोरोना
रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरात व्यापक तयारी केली जात आहे. यावेळी प्रत्येकाने घरी
राहणे फार महत्वाचे आहे. हा रोग टाळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
Post a comment