web-ads-yml-728x90

Breaking News

डेथ वारंट | निर्भयाच्या आरोपींना 20 मार्चला होणार फाशी

BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
निर्भयाच्या गुन्हेगारांना 20 मार्चला सकाळी साडे पाच वाजता फाशी दिली जाणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नवीन डेथ वारंट जारी केला आहे. दोषींजवळचे सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत. यामुळे आता 20 मार्चला त्यांना फाशी होणार निश्चित मानले जात आहे. यानुसार पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा या चारही जणांना 22 मार्च 2020 रोजी पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. नवीन डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर निर्भयाच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्तकेला आहे. तर निर्भयाच्या गुन्हेगारांचे वकील एपीसिंह हे नाखुश दिसले. दिल्ली कोर्टाने 17 फेब्रुवारीला चारही दोषींना 3 मार्चला एकत्रित फाशी द्यायचा निर्णय दिला होता. आतापर्यंत कोर्टाने या चौघांसाठी तीन वेळा डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पहिल्या दोन वेळेला दोषींनी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला यामुळे फाशीची तारीख पुढे ढकलावील लागली होती. तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी झालं होतं. मात्र याही वेळी फाशीच्या आधी दोन दोषींनी याचिका दाखल केल्या होत्या. आता चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी झालं आहे.

No comments