0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबांसाठी मोदी सरकारने आपली तिजोरी उघडली आहे. देशातील 20 कोटी महिलांच्या खात्यात थेट पैसे दिले जातील. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी दुपारी एक लाख 70 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, ज्यामार्फत सर्वसामान्यांना वेगवेगळ्या मार्गांनी मदत दिली जाईल. पुढील तीन महिन्यांकरिता देशातील सुमारे 20 कोटी महिलांच्या खात्यात सरकार दरमहा 500 रुपयांची मदत देणार आहेत.
दरमहा मिळणार 500 रूपये
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की पंतप्रधान जनधन खात्यांतर्गत बँक खाते असलेल्या सुमारे 20.5 कोटी महिलांना पुढील तीन महिन्यांकरिता दरमहा 500 रुपयांची मदत दिली जाईल. ही रक्कम प्रत्येक महिन्यात या महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.


Post a comment

 
Top