0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गप्पा मारल्या. घरातील एसी बंद ठेवा, कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू बंद होणार नाहीत, त्यामुळे साठा करु नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. इकडे चला हवा येऊ द्या आधीपासूनच सुरु आहे, मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका, अशा हलक्याफुलक्या गप्पाही मुख्यमंत्र्यांनी मारल्या. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, आज मी तुम्हाला निगेटिव्ह काहीच सांगण्यासाठी आलेलो नाही, मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. काल रात्री थोडी धावपळ झाली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गप्पा सुरु केल्या.एकूणच सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. 1971 चे युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहील पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.या निमित्ताने का होईना ना, कोरोनामुळे कुटुंबीय एकत्र येत आहेत, आपापले छंद जोपासत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. गमावलेले सर्व मिळविण्याचा प्रयत्न होत आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. 

Post a Comment

 
Top