0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. रेल्वे आणि बससेवा बंद झाल्यानंतर अनेक प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. कल्याण स्टेशन आणि बस डेपोला असे 16 प्रवाशी होते जे वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर घरी परंतु शकले नाही. दरम्यान अशा प्रवाशांसाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने जैन समाजातील एका संस्थेच्या मदतीने या प्रवासात अडकलेल्या प्रवाशांना राहण्याची तसेच जेवण्याची सोय करून दिली आहे. कल्याण येथील आराधना भवन येथे या 16 प्रवाशांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. 

Post a comment

 
Top