BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
इटलीहून आलेल्या 15 पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाली
असल्याची माहिती आहे. डीडी न्यूजने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. इटलीहून
दिल्लीला आलेल्या 15 जणांना कोरोना असल्याचं निष्पन्न झालं आहे. इटलीहून भारतात आल्यानंतर
त्यांना आता वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये आल्यानंतर एम्समध्ये नमुन्यांची
तपासणी केली. यानंतर सर्व जणांना करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं स्पष्ट झाले आहे.
या सर्वांना आयटीबीपी कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती
आहे.
Post a comment