web-ads-yml-728x90

Breaking News

नवी मुंबईतील शाळेत झालेल्या 14 मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

दिनांक 28 फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईतील शाळेतील संगणक प्रशिक्षकाने 14 मुलीचा विनयभंग केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप फिरत आहे. याची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून संबंधित संगणक प्रशिक्षकास अटक करून योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना सविस्तर पत्र लिहिले असून त्यामध्ये समुपदेशक यांनी आपली कर्तव्य योग्य रित्या पार पडली का, शाळेत सीसीटीव्ही बसवले आहेत का, शाळेत विशाखा समिती नेमण्यात आली आहे का, या बाबतही चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीस पोस्को कायदा व आयपीसी कलम 120 अंतर्गत कारवाई करण्याचा सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

No comments