0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नंदूरबार |
महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात होळीच्या आनंदावर विरजण घालणारी घटना घडली आहे उच्छल येथे तापी नदीच्या बॅक वॉटरमध्ये बोट उलटल्याने 13 जण बुडाले. यातील तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. यातील 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर परिसरात घडली.होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील एक कुटुंब सहलीसाठी आले होते. त्यांनी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी बोट घेतली. मात्र, बोटींग करत असताना भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आला आणि बोट अनियंत्रित झाली. त्यानंतर बोट उलटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पर्यटकांची बोट बुडाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं. मात्र, अंधार पडल्याने शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले आहेत. या अपघातात नवापूर तालुक्यातील दोन जणांचाही समोवश आहे.

Post a comment

 
Top