0
BY –नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - दिल्ली |
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावापासून देशाला वाचविण्यासाठी,आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी आज रात्री 12 वाजल्यापसून संपुर्ण देशात 21 दिवसांचे म्हणजे 3 आठवडयांचे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधतांना म्हंटले आहे.आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकांच्या जीवनाला वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करित आहे.त्यामुळे आपणांस प्रार्थना करित आहोत की कोणीही घराबाहेर पडू नये जे जे ज्या ठिकाणी आहेत तेथेच राहणे कारण मी पंतप्रधान म्हणून सांगत नसून आपल्याच कुटूंबातील सदस्य म्हणून सांगत आहे अशा सुचनाही यावेळी मोदी यांनी संवाद साधतांना दिल्या आहेत.तसेच कोरोना म्हणजे कोर्इ रोड पर ना निकले असे बॅनर ही यावेळी नागरिकांशी चर्चासंवाद साधतांना नरेंद्र मोदी यांनी काढुन माहिती दिली आहे.हि वेळ आपल्या एकतेची खरी ताकद दाखविण्याची आहे म्हणून आपण सर्वांनी या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लढा देऊ आणि कोरोना देशमुक्त करू,जो पर्यंत लॉकडाऊनची संकल्पना असेल तोपर्यंत आपण आपले कर्तव्य बजावयाचे आहे त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहनही आपल्या संवादेतुन केले आहे.Post a comment

 
Top