0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मोठ मोठे निर्णय घेत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश दिला. त्यानंतर राज्याच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील.असं असलं तरी दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रका प्रमाणेच होतील.अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.

Post a Comment

 
Top