web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये जनता कर्फ्युला 100 टक्के प्रतिसाद ; मुरबाडची पोलिस यंत्रणा सज्ज

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असून भारतात 260 पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात 63 लोकांना कोरोनाची लागन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.अशा कोरोनावर मात करण्यासाठी आज 22/03/2020 रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युची जाहिर करत यामध्ये तमाम भारतीय बांधवांनी घराबाहेर जाण्याचे टाळणे असे आवाहन केले आहे.
त्या आवाहनाला संपुर्ण भारताने चांगला प्रतिसाद दिला असून ठाणे जिल्हयात जनता कर्फ्युला नागरिकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला आहे.त्याचबरोबर ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात नागरिकांनी माझे प्रतिसाद जनता कर्फ्युला असे म्हणत सर्व व्यापारी वर्ग व अन्य व्यवसायिक यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.या जनता कर्फ्युला मुरबाड पोलिस काल रात्रीपासूनच सज्ज झाले आहे.
मुरबाड शहरात बस स्थानक,काळी पिवळी जीप स्टँन्ड,रिक्षा स्टॅन्ड व अन्य वाहतूक मालक,चालक वर्गांनी प्रतिसाद देत जनता कर्फ्युमध्ये सहभागी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.मात्र  म्हसा रोड लगत असणार्‍या कलिंगडवर गाय व बैलांनी धाड मारल्याने सर्व कलिंगड चांगलेच उध्दवस्त केल्याचे दिसले आहे.
डी.वाय.एस.पी.बसवराज शिवपुजे यांना प्राप्त झालेल्या सुचनेप्रमाणे मा.शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी वर्ग सज्ज झाले असून त्यांना मुरबाडकरांनी चांगले सहकार्य केले आहे.
मुरबाड कल्याण रोड व मुरबाड नगर रोड शुकशुकाट झाले असून तीनहात नाक्यावरील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
( डी.वाय.एस.पी.बसवराज शिवपुजे )
यावेळी पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे यांनी स्वतः गाडीतून मुरबाड शहारात व शहाराच्या आजु बाजूकडील गावात जाऊन पाहणी करत जनता कर्फ्यु यशस्वी ठरविण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिस यंत्रणा म्हणुन भुमिका यावेळी बजावली आहे.


No comments