0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – माणगांव,रायगड|
केंद्र सरकारमध्ये भाजपचे 303 खासदार आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत. मात्र आमचे महाआघाडीचे केवळ 100 खासदार केंद्रात भाजपला पुरून उरत आहे. असं घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे. माणगांव येथे महिला दिनानिमित्त झालेल्या दक्षिण रायगड महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. दिल्लीमध्ये गेले 10 दिवस अधिवेशन सुरू आहे. परंतु गेले 10 दिवस संसदेत कोणत्याही प्रकारचे कामकाज झाले नाही. दिल्लीत झालेल्या दंगलीचे उत्तर गृहमंत्री अमित शहांनी द्यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केली. परंतु, अमित शहा उत्तर द्यायला तयार नाहीत. असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. रायगड जिल्ह्यात रखडलेला बॅ. अंतुले यांचा स्वप्नातील रेवस रेड्डी मार्ग येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. कोकणातील चार भारतरत्नांचे स्मारक एकत्रित दापोली येथे होणार आहे. त्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार यांनी केली आहे. माणगांव शहरात कोकणातील 50 कोटी अंदाजित खर्चाचे भव्यदिव्य क्रीडा संकुल होणार आहे. माणगावातील नाट्यगृहाचे काम सुरू झाले आहे. तसेच इतर सर्व विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात दिले. यावेळी खा. सुप्रिया सुळे खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे आदींची उपस्थिती होती.


Post a comment

 
Top