web-ads-yml-728x90

Breaking News

शिवसेनेकडून राम मंदिराला दिले जाणार 1 कोटी

BY – मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौर्यावर आहेत. त्यांनी राम मंदिर निर्मितीसाठी 1 कोटींच घोषणा केली आहरे. शिवसेनेकडून हा निधी दिला जाणार आहे. आज राज्यातील ठाकरे सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत.उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचले यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ते राम मंदिराला शिवसेनेकडून 1 कोटी रुपये देणगी देत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवण्याची विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे. अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री होईन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ती गोष्ट घडली असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.पुढे ठाकरे म्हणाले की, शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती पण करोनामुळे ते शक्य नाही. मी पुन्हा अयोध्येत येईन आणि तेव्हा आरती करेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसहीत अयोध्येत दाखल झाले आहेत. दरम्यान येथे शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उत्साहात त्यांचं स्वागत केलं.


No comments