web-ads-yml-728x90

Breaking News

कार्ला येथिल एकविरा देवीच्या दर्शनाला जाणार्या भाविकांची लूट टोलनाक्यावाल्यांनी थांबवावी , वरसोली टोलनाका हलवा नाहीतर बंद करा - जयेंद्र खुणे (आगरी कोळी समाजनेते)

BY – कुणाल शेलार युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबर्इ |
संपूर्ण महाराष्ट्रातून कार्ला डोंगरात वसलेली एकविरा आर्इच्या दर्शनाला लाखो भाविक भक्तगण येत असतात.कित्येक वर्षापासून भाविकांची टोलनाक्यावरून लूटमारी ही केली जात आहे.3 ते 4 टोलनाका पार करून देवीचे दर्शन घ्यावे लागत आहे.त्यामुळे लूटमारी धंदा सुरू असताना टोलनाक्यावाल्यांची दादागिरी ही वाढली असल्याचे निदर्शनास आली आहे.वरसोलीच्या टोलावर अतिरिक्त टोल भरल्यानेच एकविरा आर्इचे दर्शन मिळते.अनेक टोल बंद झाले परंतू येथिल दर्शनाला भाविक येत असताना हा टोलनाका चालूच आहे.आणि याच टोलनाक्यातून भाविक नागरिकांची लूट केली जाते.
या गंभीर विषयाची दखल कोणाही आजपर्यंत घेतली नाव्हती तो विषय महाराष्ट्राचे लाडके आणि नवतरूणांचे मार्गदर्शक त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या मदतीची हाक,सर्व समाजांना एकत्र घेऊन जाणारे आगरी कोळी समाजनेते जयेंद्र महादेव खुणे यांनी घेऊन कार्लाच्या एकविरा देवीच्या दर्शनाआड टोलनाके येऊ नये आणि लूटमारी होऊ नये म्हणून सर्व टोलनाके विशेषतः वरसोली टोलनाका कार्लाच्या फाटयापुढे हलवण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना भेटून निवेदनाद्वारे केली असून उपमुख्यमंत्री अजितादादा पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही निवेदन देण्यात आले आहे. कित्येक वर्षापासून टोलनाक्यांची लूटी परंपरा ही चालत राहिली असून स्थानिक टोल वसूली करून दादागिरी व आरेरावची असभ्य भाषा वापरत आहेत.टोल हलवा नाहीतर बंद करा असा नारा सध्या कार्लात घुमत आहे.
          वरसोली लोणावळयाजवळ असलेल्या वरसोली टोल नाक्यावर आर्इ एकविरा देवी भक्त व भाविकांना टोल भरावा लागत असल्याने येथिल एकविरा भक्तांच्य मागणी नुसार बेहरेगाव येथिल कार्ला गडनिवासीनी आर्इ एकविरा देवीच्या यात्रेला षष्ठी,सप्तमी,व अष्टमी हे यात्रेचे मुख्य दिवस असल्याने मुंबर्इ,ठाणे,रायगड,नवी मुंबर्इ,पालघर,नाशिक व इतर जिल्हयातील आगरी,कोळी,सीकेपी,भंडारी,कुणबी व अन्य समाजबांधव व भक्त देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात त्यांना दु्रतगती मार्गावरील खालापूर टोलनाका येथे टोल भरावा लागतो तसेच वरसोली हद्दीतील कुसगाव टोलनाका व पुन्हा एक किलोमीटर अंतरावरील वरसोली टोलनाका येथे पुन्हा अतिरिक्त टोल भरावा लागतो.वरसोली टोलनाका येथेही टोल भरून भाविक कार्ला फाटा येथे फक्त 3 कि.मी अम्तराचा रस्ता वापरतात त्यामुळे ही एकविरा भक्त व भाविकांची लूट असल्याने वरसोली टोलनाका हा कार्ला फाटयाच्या पुढे स्थलांतरित करावा अशी समस्त एकविरा भक्तांची मागणी असल्याने आगरी समाजनेते जयेंद्र खुणे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.टोलनाके कार्ला फाटयाच्या पुढे हलविण्यासाठी जयेंद्र खुणे यांनी थेट शासनानी याकडे लक्ष वेधण्याकरिता व लूट थांबविण्याकरिता निवेदणाद्वारे विनंती केली आहे.

No comments