web-ads-yml-728x90

Breaking News

रिंगणे गांगोवाडी येथे श्री. गांगो मंदिरात २४वा महाशिवरात्री उत्सव उत्साहाने साजरा

BY – युवा महाराष्ट्र लाइव –  लांजा,रत्नागिरी  |
श्री. गांगो  मंदिर मध्ये महाशिवरात्री उत्सवाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक २१/०२/२०२० रोजी पहाटे  पासून गेले दोन दिवस , साजरा करण्यात आला आहे, महाअभिषेक, होमहवन, शिवलीला अमूत कथासार अध्याय ११वा, हरिपाठ,किर्तन, हळदी कुंकू, महिलांकरीता विविध खेळ व स्पर्धा, स्थानिक भजन, हरिजागर, महिला भजन डबल बारी,मुलांचे रेका डांस ,असे विविध कार्यक्रम समस्त रिंगणे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व स्थानिक गावकरी,वाडकरी मुंबई,गावातील मंडळ यांनी ह्या कार्यक्रमाची व्यवस्था,आयोजन चोख आणि शिस्तबद्ध पध्दतीने केले होते, अनेक मान्यवरांनी ह्या महाशिवरात्री पर्वास, उत्सवाला उपस्थित राहुन देवांचा देव महादेव शिव शंकराचे श्री गांगो देवाचे दर्शन घेतले आहे,
गांगोयुवक मंडळाचे अध्यक्ष विलास पर्शुराम आयरे,सचिव सुधाकर आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा तालुक्यातील रिंगणे,गांगोवाडीत २४ वा महाशिवरात्रीचा उत्स्तव आनंदाने व उत्साहात साजरा करण्यातआला.विविधसांस्कृतिक,सामाजिक,धार्मिक,कार्यक्रम तसेच पंचक्रोशीतील सामाजिक कार्य करणाऱ्या व पुरस्कार विजेत्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार,कबड्डी खेळात विजयी संघाना भव्य चषक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले,गांगोवाडीतील नळ पाणी योजना आमदार राजन साळवी यांच्या हस्ते स्थानिक वाडीला हस्तांतररीत करण्यात आली.कोकणात पडलेल्या गुलाबी थंडीतला अस्वाद घेत रिंगणे पंचक्रोशीतील व मुंबईकर चाकरमाण्यांनी गेले दोन दिवस या महाशिवरात्री ऊत्सवात भाग घेतला. या महाशिवरात्री उत्स्तवाची सांगता महाप्रसादाने झाली संपुर्ण पंचक्रोशीतील जनतेने महाप्रसादाचा लाभ घेतला.

No comments