BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही
643 वे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.11 फेब्रुवारी
सकाळी 10.30 वा.ग्रामीण रूग्णालय मुरबाड येथील सर्वप्रथम रूग्णांना फळे वाटपापासून
सुरूवात करण्यात येणार आहे.तर संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात
येणार आहे.त्याचबरोबर 12 फेब्रुवारी संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव सोहळयास
सकाळी 10.30 वा.प्रतिमेचे पुजन व आरती होणार असून दुपारी 4.30.वा भव्य मिरवणूक काढण्यात
येणार आहे.संध्याकाळी 7.30 वा भजनाबरोबर महाप्रसादाचे वाटप होणार आहे तरी सर्व भाविक
भक्तगणांनी सहकुटूंब,सहपरिवारासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संत रोहिदास
नगर,मुरबाडच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a comment