BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य शासन प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक
प्रभावीपणे वापर करत असून याद्वारे देशात ई-लोकशाही प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी ई-गव्हर्नन्स
परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. 23 व्या
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे आणि महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांच्या माहिती
तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री
सुभाष देसाई तसेच पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री.देसाई
बोलत होते.राज्य शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, केंद्राचा प्रशासकीय सुधारणा तथा
जन तक्रार विभाग, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, यांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ब्लॉक चेन सँडबॉक्सचे अनावरण करण्यात आले. उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्र
शासनाच्या उद्योग विभागाने गेल्या वर्षी नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले. त्यामध्ये
बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स, फिनटेक
पॉलिसी आदी बाबींचा समावेश केलेला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नव्या पिढीने
सर्व बाबी सुकर कराव्यात. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे. नव उद्यमींना
ब्लॉक चेन या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या प्रणालीद्वारे
राज्यातील जनतेला सर्व योजनांची सहजरित्या माहिती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न
असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
Post a comment