0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग तीन व वर्ग चारची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्काळ सुरु करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भातील बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.श्री.देशमुख म्हणाले, अनेक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग तीन व वर्ग चारची पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवेवर ताण येतो. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही विभागाने तात्काळ सुरु करावी. याशिवाय स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची क्षमता वाढविताना याबाबत सविस्तर अभ्यास करुन वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत कार्यवाही करावी.स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक असणारे एमआरआय मशीन बसविणे, कॅथलॅब सुरु करणे आणि भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेप्रमाणे नूतनीकरण, सर्जिकल मेडिकल स्टोअरचे अनुदान मिळविणे, रुग्णालयासाठी आवश्यक असणारे नवीन व्हेंटिलेटर यासाठी या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करावा, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सूचित केले.श्री. मुंडे यावेळी म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून रुग्णालयाची डागडुजी, सर्जिकल इमारतीच्या फेजचे बांधकाम, नवीन ड्रेनेज सिस्टीम करणे याबाबत पाठपुरावा करुन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Post a comment

 
Top