web-ads-yml-750x100

Breaking News

टेलीकॉम कंपन्यांना न्यायालयाचा दणका

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
एअरटेल, वोडाफोन, आयडीया आणि टाटा टेलिसर्विस कंपन्यांनी समायोजित सकल महसूल (AGR) जमा करण्यास विलंब केला (आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच दूरसंचार विभागाकडे तब्बल 1.47 लाख कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टाने कंपन्यांना दिले आहेत. पुढील सुनावणी 17 मार्च रोजी होणार आहे.
आज (14 फेब्रुवारी) रात्री 12 वाजेपर्यंत (AGR) सर्व थकबाकी भरण्यास सांगितले आहे. जर पैसे भरले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असं डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनने (DOT) सांगितले.
सुप्रिम कोर्टाचा झटका
एजीआर महसूल भरण्यासाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी एअरटेल, आयडिया, वोडाफोन आणि टाटा टेलीसर्व्हिसने सुप्रिम कोर्टात केली होती. मात्र सुप्रिम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत कारणे दाखवा नोटीस जारी केली.

No comments