web-ads-yml-728x90

Breaking News

सुनिल सकट यांना "रयतरत्न" पुरस्कार प्रदान

BY – युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) व रयत प्रतीष्ठाण च्या वतीने समाजसेवक सुनिल भिमराव सकट यांना नुकताच आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते "रयतरत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला.लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे झालेल्या पाचव्या लोककला महोत्स वात शिवजयंती चे औचीत्य साधुन सकट यांना रयतरत्न पुरस्कार बहाल करुन गौरवीण्यात आले.सुनिल सकट हे "लहुजी शक्ती सेनेचे"जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.    संघटनेच्या माध्य मातुन सकट हे मागासवर्गीय समाजाच्या विकासात्मक कार्यात मागील पंधरा वर्षापासुन कार्यरत आहेत. त्यांनी अनेक उपोषणे,मोर्चे,आंदोलने,चळवळ करुन विवीध सामाजीक विषयांवर समाजाचे प्रलंबीत प्रश्न शासन दरबारी मांडुन सोडविण्याचे व पाठपुराव्याचे कार्य करत आहेत. शासनाच्या योजनांची माहीती समाजापर्यंत पोचवीत आहेत. महामंडळाचे कर्ज, बॅंकेचे कर्ज मिळवुन देण्यासाठी पाठ पुरावा करतात स्वच्छता मोहीम, वृक्षरोपण करुन
ते जोपासले आहेत. मागासवर्गीय कर्ज थकबाकी दारांच्या कर्ज माफीसाठी वर्षानुवर्षे लढत आहे.राज्यातील गडकिल्ल्यांचे जिर्णोध्दार तथा दुरुस्ती करून पर्यटन स्थळ करण्यास शासना कडे लेखी पाठपुरावा करत आहेत.याच सामाजीक कार्याची दखल घेत सकट यांना"रयतरत्न" पुरस्कार देण्यात आलाअसे आयोजन समीतीचे वृत्त आहे. पुरस्कार वितरण समयी मेहरनाथ कलचुरी राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डाॅ.अमोल बागुल,साह्यक समाज कल्याण अधीकारी सुर्यमाला पिचड,प्रकल्प अधीकारी संध्या देशमुख,लावणी सम्राज्ञी रोहीणी थोरात,राज्य सरकारचा युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे,नेहरु युवा समन्वयक प्राचार्य सिताराम जाधव,पोपट बनकर,अॅड.महेश शिंदे,अॅड.भानुदास होले,अशोक सोनावने आदी मान्यवर उपस्थीत होते.भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते मिळालेल्या पुरस्काराने जबाबदारी वाढली असुन समाजाच्या सर्वांगीन विकासा साठी कटीबद्ध होऊन नेहमी तत्पर कार्य करणार असल्याचे सकट यांनी सांगीतले. यापुर्वी देखील सकट यांना जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सकट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments