BY – युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबई |
माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीचे
वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग आटोक्यात
आणण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जीएसटी भवनच्या 8 व्या
मजल्याला ही आग लागली.आग लागलेल्या इमारतीमध्ये जीएसटी कार्यालयासोबतच सरकारच्या अन्य
विभागाचीही कार्यालयं आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली. आगीने रौद्र रुप
धारण केलं आहे. यापूर्वी येथील कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आहे. आगीची
माहिती मिळताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीनं घटनास्थळी
पोहोचले आहेत.
Post a comment