web-ads-yml-728x90

Breaking News

पीडितेचे पार्थिव गावात, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

BY – युवा महाराष्ट्र लाइव – वर्धा  |
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली आहे. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत समोर येत आहे. तिच्या मूळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी 'रास्ता रोको' सुरू केला आहे. तसेच हिंगणघाट जळीतकांडांचा प्रकरणात शिक्षिकेचा मुत्यू झाल्याने त्यांच्या गावातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे.पीडित तरुणीचे पार्थिव दारोडा या तिच्या मूळ गावी दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या गावामध्ये संतापाचे वातावरण आहे. संतप्त ग्रामस्थांकडून रुग्णवाहिकेवर दगडफेक करण्यात आली. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून केला जातोय. यासाठी रास्तारोकोही करण्यात आला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर दारोडा या तिच्या मूळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments