0
( सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य श्री.मृत्युंजय पांडे यांचे स्वागत करताना )
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - पनवेल |
शेडूंग,पनवेल सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीतील सी.एस.एम.आय.टी संकुल तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीचे मुख्य सचिव डॉ.केशव बडाया यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची शोभा छत्रपती शिवाजी महाराज युनिवर्सिटी पनवेलचे कुलगुरू डॉ.ए.के.सिन्हा यांनूी वाढवली.तसेच विशेष अतिथी फर्जंद व फत्तेशिकस्त चित्रपटातील लोकप्रिय कलाकार निखील राऊत यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मुकेश सोनी,छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य डॉ.ए.के.ओझा,उपप्राचार्य डॉ.सविता अग्रवाल,सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य श्री.मृत्युंजय पांडे,आणि प्रयास फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल साबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक पुजनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात महाविद्दयालयीन अभ्यासक्रमातील सर्व विद्दयार्थी यांची कुतूंब गर्दीने उपस्थिती ठरली.रसायनीच्या ढोल ताशा पथकच्या गजरात वाद्दयसंगीताने संपूर्ण संकुल दुमदुमले होते.हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी याची देही याची डोळा या म्हणी प्रमाणे असे अनेक शिवभक्तगण मोठया संख्यने सामील झाले होते.या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉ.श्‍वेता उमाळे,प्रशांत काशीद व विद्दयार्थी समिती यांच्या नियोजनाद्वारे यशस्वीने पार पडला.Post a comment

 
Top