0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात राज्यस्तरीय कार्यरत असणा-या जनकल्याण सेवा फाऊंडेशनने रायगड, महाड,पोलादपुर,सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा राज्यातील विविध ठीकाणी मोठ्या थाटामाटात, उत्साहपुर्ण जल्लोषात शिवजयंती साजरी केली. 
विविध ठीकाणी महिलांनी काढलेली कलात्मक रांगोळी लक्षणिय अशीच होती.दीपोत्सव डोळ्याच पारण फेडणार,जय भवानी-जय शिवाजी चा जल्लोष, शिवरायांचे ऐतिहासिक पोवाडे,शिवभक्त मावळे,शिवचरीत्रावरील देखावे अशा प्रसंन्न मंगलमय वातावरणात सर्वनी सहभाग घेतला. 
हा जनकल्याण सेवा फाऊंडेशनचा शिवजयंती महोत्सव संस्थापक सचिन फळणे, श्रुती उरणकर, रणधिर सकपाळ,विजय फळणे व प्रत्येक जिल्ह्यातील व प्रत्येक विभागातील पदाधिकारीका-यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमय वातावरणात संपन्न झाला.सर्वत्र महिलांचा विशेष सहभाग होता. त्याबद्दल अध्यक्ष सचिन फळणे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a comment

 
Top