web-ads-yml-750x100

Breaking News

लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा अपघात

BY – युवा महाराष्ट्र लाइव – जळगाव |
लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण ठार झाल्याची माहिती आहे. डंपरच्या धडकेत क्रुझर मधील दहा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोणा गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना यावलच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
चिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथील चौधरी कुटुंबीय चारचाकीने मुक्ताईनगरकडे जात होते. दरम्यान, हिंगोणा गावाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 55) प्रभाकर नारायण चौधरी (वय 63) यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर यावल येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे

No comments