0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – वसई |
स्वतःच्या मौज मजेसाठी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फटका मारुन पाडून त्याची विक्री करणाऱ्या गॅंगला वसईरोड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही गॅंग मागील एका महिन्यापासून मेल, लोकल, शटल मधील प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईलची चोरी करत असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले आहे. यामध्ये एकूण ७ आरोपींना अटक केली असून ९ मोबाईल हस्तगत केले आहेत.
धावत्या लोकलमध्ये अथवा मेलमध्ये दरवाज्यात मोबाईलवर बोलत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल फोन चोरी झाल्याच्या घटना वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत होत्या. याबाबत अनेक तक्रारी लोहमार्ग पोलिसांकडे येत होत्या. मागील एका महिन्यापासून या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने आलेल्या तक्रारींवरून आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलिसांनी सापाळा रचून या 'फटका गॅंग' ला अटक केली आहे. 

Post a comment

 
Top