0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
साऊथ दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी  म्युनिसिपल स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व पॅरा स्पोर्ट्स अकादमी यांच्या सहकार्याने प्रथम राष्ट्रीय मनपा शालेय खेळ २०१९ अंतर्गत विविध खेळ प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी दिनांक १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत डॉ.साहेबराव वर्मा स्टेडियम , क्करोला , नजबगढ झोन , न्यू दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेत साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल , परेल या शाळेतील १२ वर्षे वयोगटातील ५ मुले , शिंदेवाडी शाळा १ मुलगा , प्रबोधनकार ठाकरे शाळा ३ मुले , अभ्युदय नगर शाळा १ मुलगा ,  पोयबावडी शाळा १ मुलगा अशा सर्व  फुटबॉल पटू मुलांची  अधिकृतरीत्या निवड केली असून पालिका शाळेतील या सर्व मुलांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या फुटबॉल कोच छगन चौहान आणि क्रीडा शिक्षक योगेश साळवी सर यांचे मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी  महेश पालकर सर‌ शारिरिक शिक्षण वरीष्ठ पर्यवेक्षक शारिरिक अनुदेश रामेश्वर लोहे सर ,राजेश घाडगे सर, कनिष्ठ पर्यवेक्षक दत्तू लवटे सर , प्रदिप मिठबावकर सर , कल्पना गुडे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे तसेच मुंबईतून देखील त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .....!

Post a comment

 
Top