web-ads-yml-750x100

Breaking News

पावणे एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबई | 
पावणे औद्योगिक वसाहती मधील केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मोरया ग्लोबल कंपनी असं या कंपनीच नाव आहे. रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. आग विझवण्यासाठी पावणे, रबाले, नेरुळ अधोगीक वसाहत तसेच, नवी मुंबई महानगर पालिकेच्या सात अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होते. केमिकल असल्याने तब्बल पाच तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच कारण अजून अस्पष्ट आहे. आगीत कंपनी जळून मोठे नुकसान झाले आहे.

No comments