BY – युवा महाराष्ट्र
लाइव – नवी मुंबई |
राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा
निर्णय मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल घेतला. त्यामुळे कोकण विभागात पाच दिवसाच्या
आवड्यानिमित्त शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यात खुशीची लहर उमटली आहे.कोकण विभागातील
ठाणे,रायगड, रत्नागिरी,पालघर जिल्हयातील या निर्णयाचे समाजातील विविध घटकांकडून स्वागत
होत आहे.
· ठाणे जिल्हा-राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा
आठवडा लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे समाजातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
(दिपाली
महाले समन्वयक - महिला संघटना म्हणतात. पाच दिवसांच्या आठवड्याबरोबर कामाचा वेळ पण
वाढणार आहे. पण कर्मचा-यांना याचा खूप फायदा होईल. जाण्यायेण्याचा प्रवास खर्च, वेळ,
वीज, पाणी यांची बचत होईल. तसा केंद्र सरकारला पण पाच दिवसांचा आठवडा आहेच. त्यामुळे
अधिकारी/कर्मचारी यांची कार्यशक्ती वाढेल.)
(आशिष येरावार
( सामान्य नागरिक) निर्णय पूर्णपणे वाचल्यानंतर समजते की, वर्षभरातील कामकाजाचे एकूण
तास वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू करून
नक्कीच कामकाजाच्या वेळेतून कोणतीही सवलत दिलेली नाही.)
(ललित अग्रवाल
(व्यावसायिक)- पण हे कामावर अवलंबून आहे. प्रकरणे जर जास्त असतील तर सरकारी कर्मचारी
रविवारी सुध्दा काम करताना आणि रात्री, अपरात्री सुध्दा काम करताना पाहिलेत. रोज रात्री
8 पर्यंत काम केलं (9.30-10 Office Timing) तरी काम संपत नाही. म्हणून रविवारी सुट्टी
असली तरी काम करावे लागते. चांगला निर्णय आहे.)
(अक्षय
बैसाने पत्रकार- निर्णय चांगला आहे परंतु सर्व कर्मचारी निणर्य इतर दिवसांसाठी दिलेल्या कामाच्या वेळेचे
किती काटेकोर पणे पालन करतील यावर हा निर्णय यशस्वी ठरेल.)
(मुक्ता
लोंढे (पत्रकार)- या निर्णयाचे मी स्वागत करते. या निर्णयामुळे कर्मचा-यांना फार मोठा
दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर कामाच्या वेळेमध्ये बदल झाल्याने ट्रेनच्या प्रवासातील
गर्दी थोडया प्रमाणात तरी कमी झाल्याचे पाहायला मिळेल.)
· रायगड जिल्हा-राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा
आठवडा लागू करण्याचा मा.मुख्यमंत्री महोदयांचा महत्वपूर्ण निर्णय असून या निर्णयाचे
समाजातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात आले
आहे.
(कमळू भगत (सामान्य नागरिक):-
राज्य शासनाने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे.
पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबांना वेळ देणे
शक्य होईल. तसेच कामाचा ताण कमी होऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल. शासकीय कार्यालयातील
वीज, पाणी, वाहनांचे पेट्रोल, डिझेल या खर्चामध्ये बचत होणार आहे असे वाटते.)
· राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा शासनाने लागू
केला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढविले आहेत.कामाचे तास वाढविल्यामुळे
नागरीकांकरीता कर्मचारी जास्त वेळ कार्यालयात उपलध्ब राहणार आहेत.त्यामूळे नागरीकांचे
काम होऊन कामाचा निपटारा ही होणार आहे - योगेश राणे (सामान्य नागरिक):-
पालघर जिल्हा-
राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा हा महत्वाचा
निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे. जिल्हयातील मान्यवरांनी
या निर्णया संधर्भात आपले विचार व्यक्त केले.दै.सकाळचे जेष्ठ पत्रकार
पी.एम.पाटील यांनी शासनाच्या निर्णया
विषयी सांगितले,पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला असला तरी दरदिवशीच्या कार्यालयीन वेळेत वाढ करून भरून काढण्यात
येणार असल्याने शासकीय कामकाजामुळे शासनाचे
कोणतेही नुकसान होणार नाही सध्या मुंबईतील कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी
पावणेदहा ते सायंकाळी साडेपाच अशी आहे . ती आता सकाळी पावणेदहा ते संध्याकाळी सव्वासहा
अशी होईल . शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा अशी असल्याने
जनतेला शासकीय कार्यालयात आपल्या कामा संबंधि अधिक वेळ मिळणार आहे . शासकीय कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा या निर्णयाचे
स्वागत केले आहे.
नवभारत चे जिल्हाप्रतिनिधी संजय सिंग
यांनी आले विचार प्रगट करताना सांगितले,मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांसाठी
देखील ही वेळ पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी राहणार असून मुंबई बाहेरील शासकीय
कार्यालयांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा अशी कामाची वेळ आहे . मात्र आता पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे
मुंबई आणि मुंबईबाहेरील सर्व कार्यालयांना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे.सध्याच्या
या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी १ ते २ या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या
जेवणाच्या सुट्टीची वेळदेखील अंतर्भूत असल्याने जनतेची कामे अधिक गतीने होणार असून
एकदिवसाच्या अतिरिक्त सुट्टी मुळे कार्यालयातील वीज, पाणी, पेट्रोल, डिझेल इत्यादी
साधनांची बचत होणार आहे.
वडार समाज लोकचळवळ,
महाराष्ट्र राज्याचे मुख्य संचालक, राजाभाऊ पवार यांनी सांगितले , राज्य सरकारी कर्मचारी
, अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करताना सर्व शनिवारी सुट्टी मिळणार असली तरी
उर्वरित पाच दिवसांत कामकाजाचे तास मात्र वाढणार आहेत . कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड
ताण असल्याने त्यांना दोन दिवस कुटूंबासोबत घालायला मिळाल्याने कर्मचारी नव्याउम्मीदने
कामकाज करतील असा विस्वास श्री पवार यांनी
व्यक्त केला .
अशावेळी त्यांना
आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळाली तर हा ताण कमी होईल,असे अधिकारी , कर्मचारी संघटनांचे
म्हणणे होते.त्यांनी कामकाजाची वेळ वाढविण्याची तयारी दर्शविली होती . आमची दीर्घकाळापासूनची
मागणी पूर्ण झाली.पाच दिवस कर्मचारी अधिक क्षमतेने काम करू शकतील.खर्चातही बचत होईल,असा
विश्वास राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी व्यक्त
केला .
पालघर कपडा असोसिएशनचे
अध्यक्ष दिलीप लाख्यानी यांनी आपले विचार व्यक्त केले , केंद्राप्रमाणे राज्यातील सरकारी कार्यालयांना प्रत्येक
महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील . यासोबतच दररोज ४५ मिनिटांचे वाढीव
काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागेल . २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी
सुरू होईल.मात्र पोलिस,रुग्णालये यासारख्या अत्यावश्यक सेवांना तसेच शिक्षण संस्थांना
हा निर्णय लागू नसेल . मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही पाच दिवसांचा
आठवडा सुरू करावा , अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती
. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे झाली असल्याने श्री लाख्यानी यांनी राज्यातील कर्मचारी
आणि अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले आहे
पालघर तालुका वसई
फेडरेशनचे अध्यक्ष गणेश प्रधान यांनी सांगितले
केंद्र सरकारप्रमाणे राजस्थान,बिहार,पंजाब,दिल्ली,तमिळनाडू,पश्चिम बंगाल या
राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे.पण राज्यात लागू नव्हता सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी असते.पाच
दिवसांच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे सरकारी कार्यालयातील वीज,पाणी,वाहनांचे डिझेल,पेट्रोल
ते या खर्चामध्ये बचत होणार आहे.तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ देणे शक्य
होऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर कार्यालयांसाठी उंचावेल त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यामधील
वसई,नालासोपारा, विरार,पालघर,बोईसर,डहाणू येथून असंख्य शासकीय कर्मचारी लोकल ट्रेनने प्रवास करतात. कार्यालयीन वेळ बदल्याने
लोकल वरचा ताण कमी होऊन अपघाताच्या प्रमाणात घट होईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली
*रत्नागिरी
जिल्हा - राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा मा.मुख्यमंत्री
महोदयांचा महत्वपूर्ण निर्णय असून या निर्णयाचे समाजातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
(नक्कीच ही एक चांगली गोष्ट आहे. कारण पाच दिवसाचा
आठवडा याने लोकांची कार्यक्षमता असेल ती वाढेल. पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे कर्मचारी
आपली भरभर कामे करण्याकडे लक्ष देतील. आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा एक दिवस संपूर्ण
कार्यालये बंद असतील तेव्हा वीजेची बचत असेल किंवा इतर जो खर्च होणार आहे. तो वाचणार
आहे. लोकांचा खोळंबा होणार नाही एवढीच अपेक्षा
आहे.)
Post a comment