web-ads-yml-750x100

Breaking News

औरंगाबाद येथील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मालजीपुरा येथील जागेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

औरंगाबाद-मालजीपुरा येथील खादी ग्रामोद्योग मंडळाची देवगिरी हायस्कूलसाठी असलेली जागा आणि खादी ग्रामोद्योग मंडळाला तेथे प्रकल्प विकसित करण्यासंदर्भात राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.मंत्रालयात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार सतीश चव्हाण व संबंधित अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, खादीग्रामोद्योग मंडळाची असलेली जागा विकसित करावी. उद्योग निर्मितीसाठी आणि उद्योगासंदर्भातील प्रदर्शनासंदर्भात विचार करुन जागा विकसित करण्यात यावी. तसेच संस्थेच्या मागणीप्रमाणे तेथे असलेल्या हायस्कूलचाही विचार करुन मुलांना सर्व सुविधा उपलब्ध होतील असा आराखडा तयार करुन विकसित करण्यात यावा. तसेच खादीग्रामोद्योग मंडळालासुद्धा उद्योग उभारणीसाठी नियोजन करुन आराखडा तयार करावा, अशा सूचनाही कुमारी तटकरे यांनी दिल्या.

No comments