0
BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यात डेंग्यु,मलेरिया,टायफार्इड साथीच्या रोगाने थैमान घातला आहे.चीन मधील व्हायरस भारतात आल्याची आफवा सोशल मिडीयावर झळकल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.मुरबाड तालुक्यातील खुटल बापगाव परिसरात डेंग्युने थैमान घातले आहे.रूग्णांवर टोकावडा ग्रामीण रूग्णालयात उपौचार सुरू आहेत.पुढार्‍यांचा पहाणीदौरा प्रसिध्दीचा फार्स ठरत आहे.प्रत्यक्षात गांवागांवात आरोग्य पथके तपासणी साठी गेले पाहिजेत डास प्रतिबंधक फवारणी झाली पाहिजे ज्या गांवात डेंग्युचे रूग्ण आहेत तेथे उपौचार केंन्द्र उभे केले पाहिजेत या सर्व रूग्णांचा औषधौपचार शासनाने करावा अशी मांगणी होत आहे.पुढार्‍यांनी भेटी देण्यापेक्षा आरोग्य साथीवर उपयोजना करा अशी अपेक्षा जनतेकडुन व्यक्त होत आहे.

Post a comment

 
Top