0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – चंद्रपूर |
जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातातील जखमींना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव स्कॉर्पिओ गाडीने मार्गावर बंद असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली अशी प्रार्थमिक माहिती समोर येत आहे.या अपघातातील मृतक गोंदिया येथे देवदर्शनाला गेलेले होते. हे सर्व लोक चंद्रपुरातील रहिवासी आहेत. गोंदिया येथे देवदर्शनाहून परत येताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका गंभीर होता की जवळपास अर्धी स्कार्पिओ गाडी ट्रकच्या मागील बाजूमध्ये घुसली आहे. 

Post a comment

 
Top