0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – बंगळुरु |
दक्षिणेकडील सुपरस्टार विजयच्या घरावर आयकराची धाड पडली आहे. सुपरस्टार विजयवर (IT raid on Tamil actor Vijay) आयकर चोरीचा आरोप आहे. त्यामुळेच इन्कम टॅक्स विभागाची त्याच्यावर वक्रदृष्टी पडली.   विजयच्या घरावर (IT raid on Tamil actor Vijay)आयकराची धाड पडली त्यावेळी विजय तामिळनाडूतील नेयवली कोलसा खाणीत त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता.  मात्र या छापेमारीमुळे विजयला शूटिंग अर्धवट सोडून घरी परतावं लागलं.
एजीएस एंटरप्रायजेस या कंपनीवरील छापेमारीदरम्यान, सुपरस्टार विजयला बिजली या सिनेमासाठी दिलेल्या पैशांवरुन गडबड झाल्याचं आढळलं. त्याबाबत आयकर विभागाने अधिक चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विजयला या सिनेमासाठी मोठी रक्कम मिळाल्याची कुणकुण आधीच आयकर विभागाला लागली होती.त्याआधी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी विजयच्या फायनान्सच्या घरातून पैशाच्या बॅग जप्त केल्या. खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅग आढळून आल्या.

Post a comment

 
Top