BY – युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबई |
भरारी प्रकाशन निर्मित, लता गुठे लिखित 'मना मना दार उघड'
व ओमकार अस्वस्त जाणिवांचे कवितासंग्रहाचा शानदार प्रकाशन सोहळा साठे महाविद्यालयातील
सभागृह येथे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री
मधु मंगेश कर्णिक व सुप्रसिद्ध नाटककार सुरेश खरे यांच्या शुभहस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षीय मनोगतात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले,
माणसाचे जीवन सुंदर, उत्तुंग, उदात्त आहे अशा जीवनाचा आस्वाद माणसाला घेता आला
पाहिजे. लता गुठे यांनी 'मना मना दार उघड' या पुस्तकामध्ये सांगितले आहे. त्यांनी
जीवनात आलेले अनुभव मोकळ्या मनाने या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवले आहेत वाचकांच्या
विचारांची दिशा बदलवणारे हे पुस्तक लिहून लता गुंठे यांनी मोठी कामगिरी केली
आहे. सकारात्मक विचारातून कोणतेही काम केलू तर त्यामध्ये यश मिळते ही लता गुठे यांची
वृत्ती आणि त्यांची चिकित्सक अभ्यास करून येणाऱ्या समस्येतून मार्ग काढण्याची पद्धत
हे त्यांच्या जीवनाचे मर्म आहे. बारारी प्रकाशनाच्या विषयी ते म्हणाले, प्रकाशन व्यवसाय
ही अतिशय किचकट गोष्ट आहे. सुप्रसिद्ध लेखककांबरोबर नवोदित साहित्य आणि ग्रामीण भागातील
लेखकांचे साहित्यही लता गुठे यांनी सातत्याने निर्माण केले आहे. त्यामध्ये नवीन
टॉकिंग बुक, इ बुक तेही काढले आहे. प्रकाशन व्यवसाय करत असताना त्यांनी स्वतःतल्या
लेखिकेलाही न्याय दिला आहे. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे हे त्यांच्या मनोगतात म्हणाले,
भरारी प्रकाशनाने आठ वर्षात दर्जेदार शंभर पुस्तकांची निर्मिती केली आहे.
ही तेवढी सोपी गोष्ट नाही आणि प्रकाशन करत असताना स्वतःचे विविध विषयावरील
13 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांनी प्रकाशनाचा आणि स्वतःच्या लेखनाचा दर्जा सांभाळला
आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.मना मना दार उघड हे पुस्तक त्यांनी पुस्तकं वाचून
लिहिलं नसून अनुभवातून लिहिलं आहे अष्टांग योगसाधना, विपष्यना , अध्यात्म विज्ञान या
सर्वांचा समग्र विचार करून हे पुस्तक समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली आहे. ओंकार अस्वस्थ
या कवितासंग्रहात विषयी डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे म्हणाले, लता गुठे यांचा ओमकार
अस्वस्थ जाणिवांचे हा कवितासंग्रह या शतकातला महत्त्वाचा कवितासंग्रह ठरावा.
लता गुठे यांच्या विषयांवरील कविता विचार करायला लावणाऱ्या आहेत. सध्या ज्या काही चार-पाच
कवी कवयित्रींनी फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठी कवितेच्या राखेतून उड्डाण केले त्यात लता
गुठे ह्या एक आहेत. त्यांची कविता कुरूप निर्माण करते.जयू भाटकर (असिस्टंट डायरेक्टर
दूरदर्शन) डॉ. मंजुषा कुलकर्णी (राजपत्रित अधिकारी वर्ग १, महाराष्ट्र राज्य) श्री
पराग आळवणी (आमदार)इत्यादी मान्यवरांची मनोगते झाली.लता गुठे यांच्या पुस्तकावर आधारित
(संत साहित्य ते बाल साहित्य) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परिसंवादासाठी
प्रमुख वक्ते होते. संत साहित्याचे अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी संत चैतन्याचा
मेळा या पुस्तकावर आधारित संत साहित्यातून वैचारिक बदल कसा घडून येतो हे उदाहरणे देऊन
सांगितलेप्राध्यापिका डॉक्टर राजश्री पाटील यांनी लता गुठे यांच्या कवितांचे अंतरंग
उलगडून दाखवले गौरी कुलकर्णी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.गौरी कुलकर्णी प्रसिद्ध
कवयित्रीकांचन अधिकारी (चित्रपट मालिका निर्मात्या व अभिनेत्री)यांनी लता गुठे लिखित
एका कथेचे सुरस अभिवाचन केलेश्री एकनाथ आव्हाड (सुप्रसिद्ध बालसाहित्यिक) लता गुठे
यांच्या बाल साहित्यातून आजच्या मुलांचे भावविश्व कसे उभे राहते हे समजावून सांगितलेप्रकाशन
सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांचा विशेष सत्कार करण्यात
आला त्यामध्ये डॉक्टर स्नेहलता देशमुख माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ. साहित्यिका माधवी
कुंटे व डॉ. विजया वाड डॉ कृष्णा नाईक (कार्यवाह मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव
शाखा) अविनाश धर्माधिकारी (एसीपी) प्रकाश राणे लेखक अभिनेते, गुरुनाथ तेंडुलकर कथाकार
यांचा समावेश आहे.या प्रकाशन सोहळ्याला अनेक क्षेत्रातील लेखक-कवी व मान्यवर उपस्थित
होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक यांनी केले.
Post a comment